Joshua 6:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे शहर आणि यातील सर्वकाही परमेश्वराचे आहे. फक्त रहाब ही वेश्या आणि तिच्या घरातील मंडळी यांना धक्कालावू नका. रहाबने आपल्या दोन हेरांना लपविले तेव्हा तिच्या घरातल्यांना मारू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे, मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे शहर आणि त्यातील सर्वकाही याहवेहला समर्पित करावे. राहाब वेश्या आणि जी कोणी माणसे तिच्या घरात असतील त्यांना वाचविले जावे, कारण आपण पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे नगर व ह्यात जे काही असेल ते सर्व परमेश्वरास समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तिच्यासोबत तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासुदांना तिने लपवून ठेवले होते.