Joshua 6:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोशवाने रहाब तिचे कुटुंबीय व तिच्या बरोबर असलेली इतर माणसे यांना संरक्षण दिले. कारण यरीहोला त्याने पाठवलेल्या दोन हेरांना तिने मदत केली होती. रहाबच्या कुटुंबाचे वास्तव्य आजही इस्राएल लोकांमध्ये आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वसत आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु यहोशुआने राहाब वेश्येस आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या सर्व नातेवाईकांना वाचविले, कारण यहोशुआने यरीहोत पाठविलेल्या हेरांना तिने लपवून ठेवले होते आणि इस्राएली लोकांमध्ये ते आजपर्यंत राहत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोशवाने राहाब वेश्या, तिच्या वडिलांचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले; तिचा वंश आजपर्यंत इस्राएल लोकांमध्ये वस्ती करून आहे; कारण जे जासूद यरीहो हेरायला यहोशवाने पाठवले होते, त्यांना तिने लपवून ठेवले होते.