Joshua 6:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यावेळी यहोशवाने एक महत्वाची शपथ घातली. तो म्हणाला: “जो कोणी यरीहो पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करील त्याला परमेश्वराचा शाप भोगावा लागेल. जो या नगराची पायाभरणी करेल त्याचा ज्येष्ठ पुत्र मरण पावेल. जो याच्या वेशी उभारील त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या समयी यहोशवाने असा शाप दिला की, “जो कोणी यरीहो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहोशुआने गंभीरपणाने शपथ घेतली: “जो कोणी यरीहो शहर पुन्हा बांधण्याचा प्रयत्न करेल, तो याहवेहसमोर शापित ठरेल: “जो कोणी या शहराचा पाया घालेल; त्याचा प्रथमपुत्र मरण पावेल, आणि जो कोणी या शहराच्या वेशी उभारेल, त्याचा धाकटा पुत्र मरण पावेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या वेळी यहोशवाने त्यांना शपथ घातली आणि तो त्यांना म्हणाला की, “जो कोणी यरीहो नगर पुन्हा बांधील त्यास परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल.”