Joshua 8:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग परमेश्वर यहोशवाला म्हणला, “भिऊ नको, हात पाय गाळू नको. सर्व योध्द्यांना घेऊन आय वर चाल करून जा. आयच्या राजाचा पराभव करायला मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी तुमच्या हाती देईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नकोस, कचरू नकोस; ऊठ, सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगरास जा. पाहा, आय नगराचा राजा, त्याची प्रजा, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “भिऊ नकोस किंवा निराश होऊ नकोस; सर्व सैन्य बरोबर घे आणि आय शहरावर हल्ला कर, कारण जिंकून घेण्यासाठी मी आय शहराचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर व त्याची भूमी तुझ्या हाती दिली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “भिऊ नको, धैर्यहीन होऊ नको; ऊठ, सर्व लढाई करणाऱ्या लोकांस बरोबर घे. आय नगरापर्यंत जा. पाहा, आयचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर आणि त्याचा देश मी तुझ्या हाती दिला आहे;