Joshua 9:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या ठिकाणातील त्याच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोशुआने त्या दिवशी इस्राएली लोकांच्या सभेकरिता आणि याहवेह निवडतील त्या ठिकाणच्या वेदीसाठी त्यांना लाकूडतोडे व पाणके म्हणून नेमले. हीच व्यवस्था आजपर्यंत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्याच्या वेदीसाठी गिबोन्यांना लाकूड तोडणारे व पाणी काढणारे म्हणून नेमले; तसे ते आजपर्यंत आहेत.