Jude 1:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनाने जो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेत आणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांची केवढी दुर्दशा होणार! ते काइनच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामच्या चुकीच्या मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहसारखे बंड करून त्यांनी त्याच्यासारखा आपला नाश करून घेतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना धिक्कार असो! त्यांनी काईनाचा मार्ग स्वीकारला आणि लाभासाठी बलामाच्या अयोग्य मार्गात त्वरेने पदार्पण केले; कोरहाच्या बंडात त्यांनी स्वतःचा नाश करून घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गात गेले आहेत; ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत.