Jude 1:12 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे, असल्यासारखे आहेत. ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात, ते फक्त स्वत:च चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत, ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात. ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते तुमच्याबरोबर निर्लज्ज मद्यपानोत्सव करतात, तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात घाणेरड्या स्थळांसारखे आहेत, ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात. ते वाऱ्याने वाहून नेलेल्या निर्जल मेघांसारखे, हेमंत ऋतूतील फलहीन, पूर्णपणे मेलेल्या व समूळ उपटलेल्या झाडांसारखे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते तुमच्याबरोबर खुशाल जेवतात तेव्हा ते तुमच्या प्रीतिभोजनात झाकलेले खडक1 असे आहेत; ते मेंढपाळ असूनही स्वतःच चरत राहतात; ते वार्‍याने वाहून नेलेले निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली, समूळ उपटलेली झाडे, असे आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे लोक प्रीती भोजनात डाग, लपलेले खडक असून तुमच्याबरोबर जेवतात—केवळ स्वतःचे पोट भरणारे मेंढपाळ. ते निर्जल मेघासारखे वार्‍याने उडून जाणारे; शरद ऋतूत फळ न देणारे, दोनदा मेलेले आणि उपटलेल्या झाडांसारखे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत, ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचे पोट भरणारे आहेत, ते वार्‍यांबरोबर निघून जाणारे निर्जल ढग आहेत, ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मरण पावलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत,