Jude 1:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्र देवदूतांसह प्रभु येत आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आदामपासून सहावा वंशज हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला की,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला आहे की, “पाहा, सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास आणि भक्तिहीन लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व भक्तिहीन कृत्यांवरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी भक्तिहीन पापी जनांनी त्याच्याविरुद्ध सांगितल्या त्यांवरून, त्या सर्वांना दोषी ठरवण्यास प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.”1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आदामानंतर सातव्या पिढीचा मनुष्य हनोखाने त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली: “पाहा, प्रभू आपल्या हजारो आणि हजारो पवित्र जणांसह येत आहेत
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही यांच्याविषयी संदेश देऊन म्हणले आहे की, “बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला.