Jude 1:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याचे कारण ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात फार पूर्वीच लिहिले आहे की अशी माणसे तुमच्यात चोरुन शिरली आहेत, ते अधार्मिक लोक आहेत. अनीतीने वागण्यासाठी देवाची दया हे निमित आहे असे ते मानतात. आणि आमचा प्रभु व एकमेव धनी अशा प्रभु येशू ख्रिस्ताला ते मानत नाहीत. जी शिक्षेसाठी यापूर्वीच नेमलेली होती, अशी ही माणसे आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कित्येक नास्तिक माणसे चोरून आत शिरली आहेत. ही माणसे आपल्या देवाच्या कृपेच्या संदेशाचा विपर्यास करून त्यांच्या अनैतिक वर्तनाचे समर्थन करतात आणि ही माणसे आपला एकमेव मालक व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. त्यांना दोषी ठरविण्यात आले, ही गोष्ट पूर्वीच पवित्र शास्त्रात भाकीत करून ठेवली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि एकच स्वामी देव व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ते नाकारतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांच्यासाठी दंडाज्ञा फार पूर्वीच लिहून ठेवलेली होती असे काही लोक गुप्तपणे तुमच्यामध्ये आत शिरले आहेत. हे अनीतिमान लोक, परमेश्वराची कृपा विकृत करून तिला अनैतिकतेचे स्वरूप देतात आणि येशू ख्रिस्त आपल्या एकाच सार्वभौम प्रभूला नाकारतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.