Judges 1:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर (म्हणजेच यरीहो) सोडले. ते यहूदा लोकांना सामील झाले. ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले. अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे. (केनी हे मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशेचा सासरा2 केनी ह्याचे वंशज यहूदाच्या वंशजांसहित खजुरीच्या नगराहून यहूदाच्या रानात गेले; हे रान अरादाजवळील नेगेबात आहे; तेथे जाऊन ते त्या लोकांबरोबर राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशेच्या सासर्याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेचा मेहुणा जो केनी त्यांचे वंशज यहूदाच्या लोकांबरोबर खजुरीच्या नगराहून अरादाजवळील यहूदातले (जे नेगेबात आहे) रान आहे तेथे चढून गेले; आणि तेथे जाऊन यहूदा लोक अराद जवळ त्या लोकांबरोबर राहिले.