Judges 1:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बन्यामीनचे वंशज यबूसी लोकांना यरुशलेममधून हुसकावून लावू शकले नाहीत. त्यामुळे आजतागायत ते यरुशलेममध्ये बन्यामीनी लोकां बरोबर राहात आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यरुशलेमेत राहणार्या यबूसी लोकांना हाकून देणे बन्यामिनाच्या वंशजांना जमेना, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरुशलेमेत बन्यामिनाच्या वंशजांबरोबर राहत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तथापि, बिन्यामीनने यरुशलेममध्ये राहणार्या यबूसी लोकांना हाकलून दिले नाही; आजही यबूसी लोक बिन्यामीन लोकांसोबत राहत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण बन्यामिनाच्या लोकांनी यरूशलेमेत राहणाऱ्या यबूसी लोकांस बाहेर घालवले नाही, म्हणून आजपर्यंत यबूसी लोक यरूशलेमेत बन्यामिनाच्या लोकांबरोबर राहत आहेत.