Judges 1:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथ-शान, ताननख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ही नगरे आणि त्यांच्या भोवतालची खेडी यातही कनानी लोक राहात होते. मनश्शेच्या वंशातील लोक या सर्वांना नगर सोडून द्यायला भाग पाडू शकले नाहीत. आणि त्यामुळे कनानी लोक तिथेच राहिले. त्यानी आपला प्रदेश सोडायचे नाकारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनश्शेने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरांतील व त्यांच्या उपनगरांतील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु मनश्शेहने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम किंवा मगिद्दो आणि त्यांच्या आसपासच्या लोकांना घालविले नाही, कारण कनानी लोकांनी त्या देशात राहण्याचा निश्चय केला होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनश्शेच्या लोकांनी बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, दोर व त्याच्या खेड्यात राहणाऱ्यांना, इब्लाम व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना आणि मगिद्दो व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना बाहेर घालवून दिले नाही. कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा निश्चय केला.