Judges 1:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हीच गोष्ट जबुलूनच्या वंशजांच्या बाबतीतही घडली. कित्रोन आणि नहलोल या शहरांमध्ये ही काही कनानी राहात होते. त्यांना जबुलूनचे लोक बाहेर घालवू शकले नाहीत. तेव्हा हे कनानी जबुलून लोकांबरोबरच राहिले. जबुलून लोकांनी त्यांना आपल्या कामांसाठी गुलाम केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जबुलूनने कित्रोन किंवा नहलोल येथे राहणार्‍या कनानी लोकांना हाकलून लावले नाही, म्हणून हे कनानी त्यांच्यामध्ये राहत होते, पण जबुलूनने त्यांना जबरीने मजूरकामाच्या अधीन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाश्यांना घालवून दिले नाही; पण जबुलूनाने कनान्यांवर बळजबरी करून कठोर परिश्रमाच्या कामास नेमले.