Judges 10:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अम्मोनी लोक मग यार्देनच्या पलीकडे गेले यहूदा, बन्यामीन आणि एफ्राईम यांच्या वंशजांशी त्यांनी लढाया केल्या. अम्मोनी लोकांमुळे इस्राएल लोकांना फार त्रास भोगावा लागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदा व बन्यामीन व एफ्राइमाची घराणे यांच्याशीही लढावयास अम्मोनी लोक यार्देन पार करून अलीकडे आले, त्यामुळे इस्राएलावर फार मोठे दु:ख आले.