Judges 11:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यावर त्या राजाने इफ्ताहच्या दूतांना सांगितले. “इस्राएल लोक मिसरमधून आले तेव्हा त्यांनी आमचा प्रदेश बळकावला. आर्णोन नदीपासून थेट याब्बोक आणि यार्देन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला. म्हणून आम्ही लढत आहोत. त्यांना आमची भूमी सलोख्याने परत करायला सांगा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासुदांना म्हटले, “इस्राएल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक व यार्देन ह्या नद्यांपर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला; आता तो मुकाट्याने परत करा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांना बोलला, “कारण की जेव्हा इस्राएल मिसरातून आले, तेव्हा त्यांनी आर्णोन नदीपासून याब्बोक व यार्देन या नद्यापर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला; तर आता तो देश शांतीने परत दे.”