Judges 11:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर इस्राएल लोकांनी अमोऱ्यांवा राजा सीहोन याच्याकडे दूत पाठवले. सीहोन हा हेशबोनचा राजा. दूत सीहोनला म्हणाले, “आम्हा इस्राएल लोकांना तुझ्या भूमीतून जाऊ दे आम्हाला आमच्या प्रदेशात पोहोंचायचे आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अमोर्यांचा राजा, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन, ह्याच्याकडे इस्राएलांनी जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, ‘कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नंतर इस्राएलने अमोर्यांचा राजा सीहोनकडे दूतांना पाठविले. जो त्यावेळी हेशबोन येथे राज्य करीत होता आणि त्याला म्हटले, ‘आम्हाला आमच्या स्वस्थानी जाण्यासाठी तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इस्राएलानी अमोऱ्यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनातल्या राजाजवळ वकील पाठवले, “आणि इस्राएलांनी त्यास म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हांला आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे.”