Judges 11:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलच्या परमेश्वर देवाने अमोऱ्यांना आपला प्रदेश सोडून द्यायला भाग पाडले आणि तो प्रदेश इस्राएल लोकांना दिला. आता इस्राएल लोकांना तो प्रदेश सोडायला लावणे तुला जमेल असे तुला वाटते?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्राएल हिच्याकरता अमोर्यांना घालवून दिले आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराने आपल्या इस्राएली लोकांपुढून अमोर्यांना घालवून टाकले, तर ते परत मागण्याचा तुला कोणता अधिकार आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता इस्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्राएल याच्यापुढून अमोऱ्यांना घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय?