Judges 11:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मवाबचा राजा सिप्पोर पुत्न बालाक याच्या पेक्षा तू चांगला आहेस का? तो कोठे वाद घालत बसला? तो कधी इस्राएल लोकांशी युध्द करायला सरसावला का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्राएलाशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता सिप्पोरपुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय?