Judges 11:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अरोएर नगरापासून मिन्नीथ नगरापर्यंत वीस नगरे त्याने काबीज केली. आबेल करामीम येथपर्यंत त्याने अम्मोन्यांचा बीमोड केला. इस्राएल लाकांनी अम्मोन्यांचा पराभव केला. अम्मोन्यांचा हा पराभव प्रचंड होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अरोएरापासून मिन्नीथपर्यंतच्या वीस नगरांत आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला. अशा प्रकारे इस्राएल लोकांनी अम्मोनी लोकांचा नक्षा उतरवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अरोएरापासून ते मिन्नीथापर्यंतच्या वाटेवरील सर्व वीस नगरांमध्ये आणि दूर आबेल-करामीमपर्यंत त्याने अम्मोन्यांची भयंकर कत्तल केली. अशाप्रकारे इस्राएली लोकांनी अम्मोनी लोकांस जेरीस आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अरोएरापासून मिन्नीथाजवळ येईपर्यंत त्यास मारून वीस नगरे घेतली, आणि द्राक्षमळ्यांच्या आबेल-करामीमपर्यंत त्यांची फार मोठी कत्तल केली; असे अम्मोनी लोक इस्राएल लोकांच्या स्वाधीन झाले.