Judges 11:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इफ्ताह मिस्पा येथे परतला. तो घरी पोचतो तो त्याची मुलगी त्याला सामोरी आली. त्याची ही एकुलती एक मुलगी खंजिरी घेऊन नृत्य करत पुढे आली. इफ्ताहचे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिच्याखेरीज त्याला दुसरे मूलबाळ नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवत व नाचत त्याला सामोरी आली. ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा किंवा मुलगी नव्हती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा इफ्ताह मिस्पाह येथे आपल्या घरी परतला, त्याची कन्या डफ वाजवित व आनंदाने नृत्य करीत त्याला भेटण्यास बाहेर आली! ती त्याची एकुलती एक कन्या होती, तिच्याशिवाय त्याला पुत्र किंवा कन्या नव्हती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग इफ्ताह मिस्पात आपल्या घरी आला; तेव्हा पाहा, त्याची कन्या त्यास भेटायला डफ व नाचणारे यांच्यासह बाहेर आली; ती तर त्याचे एकुलते एक मूल होती; तिच्याशिवाय त्यास पुत्र किंवा कन्या नव्हती.