Judges 11:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ती त्याला म्हणाली, “बाबा, तुम्ही नवस बोलला आहात तर तो फेडायलाच हवा. कबूल केलेत त्याप्रमणे आता वागा. परमेश्वराने ही अम्मोन्यांचा पराभव करायला तुम्हाला साहाय्य केलेच की नाही?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याला म्हणाली, “बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेल्या शब्दाप्रमाणेच माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अम्मोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझ्या पित्या,” तिने म्हटले, “याहवेहला तुम्ही आपले वचन दिलेले आहे. तुम्ही दिलेल्या वचनानुसार माझ्यासोबत करा, कारण याहवेहने तुमचे शत्रू अम्मोनी लोकांवर तुम्हाला विजय दिलेला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ती त्यास बोलली, “हे माझ्या बापा, तू परमेश्वराकडे नवस केला आहे, तर तू जे वचन दिले त्याप्रमाणे तू माझ्याशी सर्वकाही कर; कारण परमेश्वराने तुझे शत्रू अम्मोनी लोक यांचा तुझ्यासाठी सूड घेतला आहे.”