Judges 11:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढे ती आपल्या वडीलांना म्हणाली, “पण माझ्यासाठी एक करा. दोन महिने मला एकटीला राहू द्या. डोंगरांमध्ये मी राहीन. आता माझे लग्न होणार नाही की मला मुलेबाळे होणार नाहीत. तेव्हा मला आणि माझ्या सख्यांना गव्व्यात गळे घालून शोक करू द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, “मात्र माझ्यासाठी एवढे करा की मला दोन महिन्यांचा अवधी द्या म्हणजे मी आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे ह्याबद्दल शोक करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु माझी एक विनंती मान्य करा,” ती म्हणाली. “मला माझ्या सख्यांबरोबर दोन महिने डोंगरावर फिरू द्या आणि माझा विवाह कदापि होणार नाही, याबद्दल शोक करू द्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणखी तिने आपल्या बापाला म्हटले, “माझ्यासाठी ही एक गोष्ट करा की मला दोन महिन्यांची रजा द्या, म्हणजे मी आपल्या मैत्रीणीबरोबर डोंगरावर जाऊन आपल्या कुमारीपणाबद्दल शोक करेल.”