Judges 11:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावर ही वडीलधारी मंडळी म्हणाली, “अडचण आहे म्हणून तर आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. आता कृपा करुन अम्मोन्यांच्या विरुद्ध उठाव करायला आमच्या बरोबर चल. गिलादातील सर्वांचा तू सेनापती होशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर चला, आणि अम्मोनी लोकाशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा गिलादाच्या वडीलांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की, तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमचा अधिकारी असा होशील.”