Judges 12:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग इफ्ताहने गिलादमधील लोकांना एकत्र केले. त्यांनी एफ्राईमशी युध्द केले. ते युध्दात उतरले कारण एफ्राईम लोकांनी गिलादांचा अपमान केला होता. ते म्हणाले होते, “गिलादांनो, तुम्ही म्हणजे एफ्राईमांनी जीवदान दिलेले पळपुटे आहात. तुम्हाला स्वत:चा प्रदेश सुध्दा नाही. तुमच्यातील काही भाग एफ्राईमांचा तर काही मनश्शेचा आहे.” गिलादांनी एफ्राईमांचा पराभव केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर इफ्ताहाने गिलादाची सर्व सेना जमा करून एफ्राइमाशी युद्ध केले. गिलादाच्या सैनिकांनी एफ्राइमाचा पराभव केला; कारण ते म्हणत होते, “एफ्राईम व मनश्शे ह्यांच्यामध्ये राहणार्‍या गिलाद्यांनो, तुम्ही एफ्राइमातून आलेले पळपुटे आहात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग इफ्ताहाने गिलआदाच्या माणसांना एकत्र बोलाविले आणि एफ्राईमच्या विरुद्ध युद्ध केले. गिलआदाच्या माणसांनी एफ्राईमच्या लोकांना मारले, कारण ते म्हणाले होते, “तुम्ही गिलआदाचे लोक एफ्राईमातून व मनश्शेहतून पळपुटे आहात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इफ्ताहाने गिलादाची सर्व माणसे एकत्र जमवून आणि एफ्राइमाशी लढाई केली, आणि गिलादी मनुष्यांनी एफ्राइमावर हल्ला केला, कारण ते म्हणाले होते, “एफ्राइम व मनश्शे यांच्यामध्ये राहत आहा ते तुम्ही गिलादी एफ्राइमातले पळपुटे आहात.”