Judges 13:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मानोहा उठून बायकोच्या मागोमाग गेला. त्या माणसाजवळ आल्यावर त्याला म्हणाला, “पूर्वी माझ्या बायकोशी बोलून गेलास तो तूच का?” दूत म्हणाला, “हो, तोच मी”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, “आपणच ह्या स्त्रीशी संभाषण केले होते काय?” तो म्हणाला, “होय मीच.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मानोहा उठला आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी गेला, तो त्या पुरुषाजवळ गेला व त्याला विचारले, “त्या दिवशी माझ्या पत्नीशी बोलणारे आपणच आहात का?” त्याने उत्तर केले, “मीच आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्यामागे चालून त्या पुरुषाजवळ गेला, आणि त्यास बोलला, “जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता,” तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, “होय मीच आहे.”