Judges 13:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचा दूत म्हणाला, “तुम्ही मला ठेवून घेतलेत तरी मी तुमचे काही खाणार नाही. पण तुम्हाला काही करायचेच असेल तर परमेश्वरासाठी होमार्पण करा.” (हा खरच परमेश्वराचा दूत आहे याची मानोहाला कल्पना नव्हती.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, “तू थांबवलेस तरी मी तुझ्या हातचे खाणार नाही; तू होमबली केलास तर तो परमेश्वरासाठी केला पाहिजेस.” तो परमेश्वराचा दूत असल्याचे मानोहाला ठाऊक नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “तुम्ही मला रोखून धरले तरी मी तुमचे भोजन खाणार नाही. पण जर तुम्ही होमार्पण तयार केले तर ते याहवेहला अर्पण करा.” (हा याहवेहचा दूत आहे, हे अद्यापही मानोहाला समजले नव्हते.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, “मी जरी थांबलो तरी, मी तुझे अन्न खाणार नाही; परंतु जर तू होमार्पण करशील, तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल,” (तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता, हे मानोहाला कळले नव्हते)