Judges 13:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग जे जे घडले ते मानोहा व त्याची पत्नी यांनी पाहिले वेदीवरुन ज्वाळा आकाशाकडे झेपावत असताना त्यातूनच तो परमेश्वरदूत स्वर्गस्थ झाला. हे पाहताच उभयतांनी जमिनीवर लोटांगण घातले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेतून आरोहण केले. ते पाहून मानोहा व त्याची बायको ह्यांनी लोटांगण घातले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना वेदीवरून आकाशाकडे उफाळून वर जाणार्या अग्नीच्या ज्वालेवर याहवेहच्या दूताने आरोहण केले. ते पाहून मानोहा आणि त्याची पत्नी यांनी दंडवत घातले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला, तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लावून नमन केले.