Judges 13:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण तू गर्भवती राहून पुत्राला जन्म देशील. तो परमेश्वराचा असेल. तो नाजीर होईल. त्यांचे जावळ काढू नको. जन्माला येण्याअगोदर पासूनच परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी असेल. पलिष्ट्यांपासून तो इस्राएलांचे रक्षण करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण पाहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नकोस, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल. आणि इस्राएलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तू गर्भवती होशील आणि पुत्राला जन्म देशील, गर्भावस्थेपासूनच तो परमेश्वराला समर्पित नाजीर असा होईल म्हणून त्याच्या केसाला वस्तऱ्याचा स्पर्श करू नकोस, कारण इस्राएलला पलिष्ट्यांच्या हातून सोडविण्यास तोच नेतृत्व करेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल. आणि तो इस्राएलाला पलिष्टयाच्या जाचातून सोडवण्याचा आरंभ करील.”