Judges 14:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा चौथ्या दिवशी ते सगळे शमशोनच्या बायकोकडे आले. तिला म्हणाले, “आमची फजिती करायला इथे बोलावून घेतले आहे काय? काहीतरी युक्ती लढवून तू आपल्या नवऱ्याकडून या कोड्याचा अर्थ काढून घे. तसे केले नाहीस तर तुला आणि तुझ्या वडीलांच्या घरतील सर्वांना आम्ही घरादारासकट जाळून टाकू.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चवथ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, “तू आपल्या नवर्‍याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगायला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या घराला जाळून टाकू. तुम्ही आम्हांला लुबाडायला येथे बोलावले आहे, असेच ना?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीस म्हणाले, “तुझ्या पतीला फूस लावून या कोड्याचा अर्थ काढून घे नाहीतर किंवा तुझ्यासह आम्ही तुझ्या वडिलांचे घर तुम्ही मरेपर्यंत जाळून टाकू. आमची मालमत्ता चोरण्यासाठी आम्हाला या मेजवानीला बोलाविले होते का?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर चौथ्या दिवशी ते शमशोनाच्या पत्नीला म्हणाले, “तू आपल्या नवऱ्याकडून युक्तीने कोड्याचे उत्तर मिळवून आम्हांला सांग, नाही तर आम्ही तुला व तुझ्या वडिलाच्या कुटुंबाला जाळून टाकू; तुम्ही आम्हांला दरिद्री करण्यासाठी म्हणून बोलावले आहे काय?”