Judges 14:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सातव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अशाप्रकारे पलिष्ट्यांना उत्तर मिळाले. ते शामशोनकडे येऊन म्हणाले. “मधापेक्षा मधुर ते काय? सिंहापेक्षा उग्र ते काय?” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला. “तुम्ही माझी कालवड नांगराला जुंपली नसती तर तुम्हाला हे कोडे कधीच उलगडले नसते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सातव्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड ते काय? आणि सिंहापेक्षा उग्र ते काय?” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हांला माझे कोडे कधीच उलगडले नसते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सातव्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी नगरातील लोक त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड काय आहे? सिंहापेक्षा बलवान काय आहे?” शमशोन त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीने नांगरणी केली नसती, तर तुम्ही माझे कोडे सोडविले नसते.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि सातव्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी त्या नगरातल्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “मधापेक्षा गोड ते काय? सिंहापेक्षा बळकट काय आहे?” तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “जर तुम्ही माझ्या कालवडीला नांगराला जुंपले नसते, तर तुम्हाला माझे कोडे उलगडता आलेच नसते.”