Judges 14:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग शमशोन खूप संतापला. परमेश्वराचा आत्मा प्रचंड सामर्थ्यानिशी त्याच्यात संचारला. आणि अष्कलोनवर चालून जाऊन त्याने तीस पलिष्ट्यांचा वध केला. मृतांचे कपडे आणि मालमता त्याने काढून घेतली. ते सर्व त्याने ज्यांनी कोडे उलगडले त्या सर्वां देऊन टाकले. मग तो आपल्या वडीलांच्या घरी परतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि तो अष्कलोनाला गेला. तेथली तीस माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले; आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर याहवेहचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. तो खाली अष्कलोनला गेला, त्यांच्यापैकी तीस लोकांना मारले, त्यांच्याकडून सर्वकाही काढून टाकले आणि ज्यांनी कोडे समजावून सांगितले त्यांना त्यांचे कपडे दिले. रागाने पेटून तो आपल्या वडिलांच्या घरी परतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर परमेश्वराचा आत्मा एकाएकी सामर्थ्याने त्याच्यावर आला. शमशोन खाली अष्कलोन नगरास गेला आणि त्याने त्यांच्यातले तीस पुरुष मारले, त्यांना लुबाडून घेतले आणि त्याच्या कोड्याचे उत्तर सांगणाऱ्यांना त्याने ते कपड्यांचे जोड दिले; त्यास खूप राग आला होता, आणि तो त्याच्या वडिलाच्या घरी निघून गेला.