Judges 14:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घरी परतल्यावर तो आपल्या आईवडीलांना म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे; ती मला बायको करून द्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथून परत आल्यावर, तो आपल्या आईवडिलांना म्हणाला, “मी तिम्नाह इथे एक पलिष्टी स्त्री पाहिली आहे; मला ती माझी पत्नी करून द्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो जेव्हा माघारी आला तेव्हा त्याने आपल्या बापाला व आईला ह्याविषयी सांगितले, “मी तिम्नात पलिष्ट्यांची एक मुलगी पाहिली आहे; तर आता तुम्ही ती मला पत्नी करून द्या.”