Judges 14:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्याचे आईवडील त्याला म्हणाले. आपल्या नातेवाइकांच्या आणि इस्राएल लोकांच्या मुलीमध्ये तुझी पत्नी होण्यासारखी स्त्री नाही का? पलिष्ट्यांमधील मुलीशीच कशाला तुला लग्न करायला हवे? त्या लोकांची सुंताही झालेली नसते.” पण शमशोन म्हणाला, “तीच मुलगी मला हवी मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या आईवडिलांनी प्रत्युत्तर दिले, “तुझ्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या सर्व लोकांमध्ये स्वीकार करण्यायोग्य स्त्री नाही काय? सुंता न झालेल्या पलिष्टी लोकांकडे पत्नी मिळविण्यासाठी जावे काय?” परंतु शमशोनाने आपल्या वडिलांना म्हटले, “मला तीच हवी आहे. ती माझ्यासाठी योग्य आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु त्याचे आई व बाप त्यास म्हणाले, “तुझ्या नातेवाईकांत किंवा तुझ्या लोकांमध्ये कोणी मुली नाहीत काय, म्हणून तू बेसुंती पलिष्ट्यांतली पत्नी करून घ्यायला जात आहेस?” तथापि शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मजसाठी मिळवून द्या; कारण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तेव्हाच मला ती पसंत पडली आहे.”