Judges 14:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करायला परत जात असताना, त्या तरुण सिंहाचे कलेवर पाहायला वळला. त्याला त्याच्यावर मधमाश्यांनी पोळे केलेले दिसले. त्यात थोडा मधही होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला तेव्हा त्यात मधमाश्यांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही वेळानंतर, जेव्हा तो तिच्यासोबत विवाह करण्यासाठी परत आला, आडवाट करून तो सिंहाचे कलेवर पाहण्यास गेला आणि त्यामध्ये त्याने मधमाश्यांचा थवा आणि काही मध पाहिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही दिवसानंतर तो तिच्याशी लग्न करण्यास परत गेला, तेव्हा तो त्या सिंहाचे मृत शरीर पाहायला बाजूला वळला; आणि त्या सिंहाच्या मृत शरीरात मधमाश्यांचा थवा व मध तेथे त्याने पाहिला.