Judges 15:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गव्हाच्या कापणीच्या हंगामात शमशोन आपल्या बायकोच्या भेटीला निघाला. एक करडूही त्याने भेटीदाखल घेतले. माझ्या पत्नीच्या दालनात मी जातो असे तो म्हणाला. पण तिच्या वडीलांनी त्याला आत जायला मज्जाव केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
काही दिवसांनी गहू कापण्याच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या बायकोला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी आतल्या खोलीत आपल्या बायकोकडे जातो;” पण त्याच्या सासर्‍याने त्याला आत जाऊ दिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देत नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही दिवसानंतर गव्हाच्या हंगामात शमशोन एक करडू घेऊन आपल्या पत्नीला भेटण्यास गेला; तेव्हा तो स्वत:शी म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जाईन” परंतु तिच्या पित्याने त्यास आत जाऊ दिले नाही.