Judges 15:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे ऐकल्यावर तीन हजार यहूदी एटाम खडकातील गुहेपाशी शमशोनला भेटायला गेले. ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आपल्यावर पलिष्ट्यांचे राज्य आहे हे तुला समजत नाही का?” शमशोन म्हणाला, “ते माझ्याशी जसे वागले तशीच त्यांना मी शिक्षा दिली आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यहूदातले तीन हजार वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी आमच्यावर सत्ता चालवत असल्याचे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस?” तो त्यांना म्हणाला, “त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा यहूदाहचे तीन हजार लोक खाली एटाम खडकातील गुहेकडे गेले आणि ते शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी लोक आपल्यावर राज्य करतात हे तुला माहिती नाही काय? तू आमच्यासोबत हे काय केले आहे?” त्याने उत्तर दिले, “ज्याप्रकारे त्यांनी माझ्याशी वर्तन केले तसेच मीही त्यांच्याशी केले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर यहूदातली तीन हजार माणसे खाली एटाम दरीच्या उंच कड्याजवळ जाऊन शमशोनाला म्हणाली, “पलिष्टी आमच्यावर राज्य करतात, हे तुला माहीत नाही काय? तर तू हे काय केले?” शमशोन त्यांना म्हणाला, “जसे त्यांनी माझे केले, तसे मी त्यांचे केले आहे.”