Judges 15:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यावर ते लोक शमशोनला म्हणाले, “आम्ही तुझ्या मुसक्या बांधून तुला पलिष्ट्यांच्या स्वाधीन करायला आलो आहोत.” शमशोन म्हणाला, “तुम्ही स्वत: मला इजा करणार नाही एवढा शब्द तुम्ही मला द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते शमशोनाला म्हणाले, “तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहोत.” शमशोन त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ वाहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते त्याला म्हणाले, “आम्ही तुला बांधण्यासाठी आणि तुला पलिष्टी लोकांच्या हवाली करण्यासाठी आलो आहोत.” शमशोन म्हणाला, “तुम्ही मला ठार मारणार नाही, अशी शपथ माझ्याजवळ खा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते शमशोनाला म्हणाले, “आम्ही तुला बांधून पलिष्ट्यांच्या हाती देण्यासाठी आलो आहोत. तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला,” तुम्ही स्वत: मला मारून टाकणार नाही, “अशी माझ्याजवळ शपथ घ्या.”