Judges 15:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदी म्हणाले, “मान्य आहे, आम्ही फक्त तुला बांधून पलिष्ट्यांच्या हवाली करतो तुझ्या जिवाला धक्कालावणार नाही.” त्याप्रमाणे त्यांनी शमशोनला दोन नवीन दोरखंडांनी बांधून गुहेतून वर आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याला म्हणाले, “नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू; खरेच, आम्ही तुला ठार मारणार नाही.” मग त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधून खडकावरून आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आम्ही सहमत आहोत,” त्यांनी उत्तर दिले. “आम्ही फक्त तुला बांधणार आणि तुला त्यांच्या हवाली करणार. आम्ही तुला मारणार नाही.” तेव्हा त्यांनी त्याला दोन नव्या दोरांनी बांधले आणि खडकाच्या कपारीतून बाहेर आणून वर घेऊन गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी त्यास सांगितले की, “नाही, आम्ही फक्त तुला दोरीने बांधू आणि तुला त्यांच्या हाती सोपवू. आम्ही तुला वचन देतो, आम्ही तुला मारून टाकणार नाही.” तेव्हा त्यांनी दोन नव्या दोरांनी त्यास बांधून खडकातून वर नेले.