Judges 15:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमशोन लेही या ठिकाणी आला तेव्हा पलिष्टी लोक त्याला सामोरे आले. ते आनंदाने आरोव्व्या मारत होते त्याच वेळी शमशोनमध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा प्रचंड सामर्थ्यानिशी संचार झाला. तेव्हा शमशोनचे दोरखंड जसे काही वाखाच्या जळलेल्या दोरीप्रमाणे कुचकामी झाले आणि त्यामुळे ते त्याच्या दंडांवरून आपोआप गळून पडले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो लेहीपर्यंत येऊन पोहचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तो लेहीला पोहोचला, तेव्हा पलिष्टी लोक ओरडत पुढे आले. याहवेहचा आत्मा मोठ्या सामर्थ्याने त्याच्यावर उतरला. ज्या दोरांनी त्याच्या दंडांना बांधले होते ते दोर अग्नीत जळून गेलेल्या तागासारखे झाले आणि त्याच्या हातांवरून गळून पडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा तो लेहीस पोहचला, तेव्हा पलिष्ट्यांनी त्यास पाहून पलिष्टी आनंदाने ओरडू लागले; आणि परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि त्याच्या हातांना बांधलेले दोर ताग जळतो तसे झाले आणि दोर हातातून गळून पडले.