Judges 15:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा देवाने लेहीत खडक फोडून एक भेग पाडली आणि त्यातून पाणी बाहेर उसळले शमशोन ते पाणी पिऊन ताजातवाना झाला. पुन्हा त्याच्या अंगात जोर आला. त्या झऱ्याचे नाव त्याने एन-हक्कोरे म्हणजे “धावा करणाऱ्याचा झरा” असे ठेवले. लेही शहरात हा झरा अजूनही आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परमेश्वराने लेही येथे एक खळगा फोडून उघडला आणि त्यातून पाणी वाहू लागले. ते पाणी पिऊन त्याच्या जिवात जीव आला व तो ताजातवाना झाला. ह्यावरून त्याचे नाव त्याने एन-हक्कोरे (धावा करणार्‍यांचा झरा) असे ठेवले. तो अद्याप लेहीत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा परमेश्वराने लेहीतील खोलगट जागा दुभंगली आणि त्यातून पाणी बाहेर आले. जेव्हा शमशोन ते पाणी प्याला, तेव्हा त्याची शक्ती परत आली आणि तो ताजातवाना झाला. मग त्याने त्या ठिकाणाचे नाव एन-हक्कोरे असे ठेवले. आज देखील तो झरा लेही येथे आढळतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा देवाने लेहीमधील खोलगट जागा दुभंगून फोडली, आणि त्यातून पाणी निघाले; जेव्हा तो ते प्याला, तेव्हा त्यास परत शक्ती आली आणि त्याच्या जीवात जीव आला. यावरुन त्या जागेचे नाव एन-हक्कोरे पडले; ती जागा आजपर्यंत लेहीमध्ये आहे.