Judges 15:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“कोणी केले हे सगळे?” पलिष्टी विचारु लागले. कोणी तरी म्हणाले. “तिम्न येथील एकाचा जावई शमशोन हा या सगव्व्याच्या पाठीमागे आहे. कारण त्याच्या सासऱ्याने आपली मुलगी शमशोन ऐवजी त्यांच्या विवाहातील सोबत्याला दिली.” हे ऐकल्यावर पलिष्ट्यांनी शमशोनची बायको आणि तिचे वडील यांना जिवंत जाळले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पलिष्टी विचारू लागले, “हे कोणी केले?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “तिम्नाकराचा जावई शमशोन ह्याने; कारण त्याच्या सासर्‍याने त्याची बायको काढून त्याच्या सोबत्याला दिली आहे.” मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या बापाला जाळून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, लोकांनी उत्तर दिले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले आहे, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.” तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” नंतर त्यांनी म्हटले, “तिम्नाकराचा जावई शमशोन याने केले, कारण त्याने त्याची पत्नी घेऊन त्याच्या मित्राला दिली. मग पलिष्ट्यांनी जाऊन तिला व तिच्या पित्याला आग लावून जाळून टाकले.