Judges 16:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्यानेे म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दलीलाने नवे दोर आणून त्याला बांधले व म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” त्या वेळी काही लोक आतल्या खोलीत दबा धरून बसले होते. तेव्हा धागा तोडावा तसे त्याने आपल्या दंडावरचे ते दोर तटातट तोडून टाकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दलीलाने नवीन दोर घेतले आणि त्यांनी त्याला बांधून टाकले. नंतर लोक खोलीत लपून बसलेले होते, ती त्याला म्हणाली, “शमशोन पलिष्टी लोक तुमच्यावर चालून आले आहेत!” परंतु शमशोनाने दंडाला बांधलेले दोर, सुताचा धागा तोडावा त्याप्रमाणे तोडून टाकले!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा दलीलाने नवे दोर घेऊन त्याने त्यास बांधले, आणि त्यास म्हटले, “शमशोना, पलिष्टी तुझ्यावर चालून आले आहेत.” तेव्हा ते आतल्या खोलीत वाट पाहत बसले होते. परंतु शमशोनाने त्याच्या दंडाला बांधलेले दोर धाग्याच्या तुकड्यासारखे तोडून टाकले.