Judges 16:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, “तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर ’मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे कसे म्हणता? तुम्ही मला तीन वेळा फसवले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ती त्याला म्हणाली, “जेव्हा तुमचे हृदय माझ्यावर नाही, तेव्हा तुम्हाला कसे म्हणता येईल, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो?’ ही तिसरी वेळ आहे जेव्हा तुम्ही मला मूर्ख बनविले आहे आणि तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य सांगितले नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती त्यास म्हणाली, “तुमचे रहस्य जर तुम्ही मला सांगत नाहीतर, मी तुझ्यावर प्रेम करतो, असे तुम्ही कसे म्हणू शकता? तीन वेळा तुम्ही माझी थट्टा केली, आणि आपले महान बळ कशात आहे हे मला सांगितले नाही.”