Judges 16:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्टी अधिकाऱ्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मलानक्की सांगितले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला वचन केलेले पैसेही घेऊन आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपले सारे मनोगत सांगितल्याचे पाहून दलीलाने पलिष्ट्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की, “आणखी एकदाच या. कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा दलीलाने पाहिले की त्याने तिला सर्वकाही सांगितले आहे, तेव्हा तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांना निरोप पाठविला, “एकदा अजून या; त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांच्या हातात चांदी घेऊन परत आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा दलीलाने पाहिले त्याने आपले सर्वकाही सत्य सांगितले तेव्हा; तिने पलिष्ट्यांच्या अधिकाऱ्यांस बोलावणे पाठवले म्हणाली, “पुन्हा या, कारण त्याने मला सर्वकाही सांगितले आहे.” तेव्हा पलिष्टयांचे अधिकारी आपल्या हाती रुपे घेऊन तिच्याकडे गेले.