Judges 16:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणीतरी हे पाहून शमशोन आला असल्याचे गज्जाच्या लोकांना सांगितले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दबा धरुन बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुगावा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडताच आपण त्याला मारु”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जा-करांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. ‘सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू’ असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाझा येथील लोकांना सांगण्यात आले, “शमशोन येथे आला आहे!” म्हणून त्यांनी त्या जागेला वेढा घातला आणि त्याची वाट पाहत शहराच्या वेशीत रात्रभर दबा धरून बसले. त्यांनी रात्रभर कोणतीही हालचाल केली नाही, ते म्हणाले, “पहाटेस आपण त्याला ठार मारू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गज्जेकरास सांगण्यात आले की, “शमशोन तिथे आला आहे.” गज्जकरांना ती जागा घेरून टाकली आणि नगराच्या वेशीच्या दाराजवळ त्याच्यासाठी गुप्तपणे दबा धरून ते सारी रात्र वाट पाहत राहिले. त्यांनी रात्रभर काही हालचाल केली नाही. ते म्हणाले, सकाळ उजडेपर्यंत आपण वाट पाहू या आणि मग आपण त्यास जिवे मारू.