Judges 16:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करुन घेऊ शकेन.” पण परमेश्वर आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग ती म्हणाली, “शमशोन, तुमच्यावर पलिष्टी चालून आले आहेत!” तो आपल्या झोपेतून जागा झाला आणि त्याला वाटले, “मी पूर्वीप्रमाणेच बाहेर जाईन आणि झटका मारून स्वतःस मोकळे करेन.” परंतु याहवेहने त्याला सोडले आहे, हे त्याला कळले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती म्हणाली, “हे शमशोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हा तो आपल्या झोपेतून जागा होऊन उठला म्हणाला, मी पहिल्या वेळेप्रमाणे बाहेर जाईन आणि अंग हालवून सुटेल. परंतु परमेश्वराने त्यास सोडले होते, हे त्यास कळले नाही.