Judges 16:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडून टाकले. नंतर ते त्याला खाली गाझा येथे घेऊन गेले. त्याला कास्याच्या साखळ्यांनी जखडून कारागृहात त्याला धान्य दळावयाला लावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पलिष्ट्यांनी तर त्यास धरून त्याचे डोळे फोडून टाकले; नंतर त्यास खाली गज्जात नेऊन पितळेच्या बेड्यांनी जखडले. मग तो बंदिशाळेत धान्य दळीत असे.