Judges 16:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर पलिष्ट्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रीत्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले; ते म्हणू लागले, “आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता पलिष्ट्यांचे अधिकारी त्यांचे दैवत दागोन याला यज्ञ अर्पण करून उत्सव करण्यास एकत्र आले आणि म्हणाले, “आमच्या दैवताने आमचा शत्रू शमशोनला आमच्या हाती दिले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याच्यासाठी मोठा यज्ञ अर्पण करावयास एकत्र जमले; कारण ते म्हणाले, “आमच्या देवाने आमचा शत्रू शमशोन आमच्या हाती दिला आहे.”