Judges 16:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरुंगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करुन घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आनंदाच्या भरात म्हणाले, “शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते मोठ्या आनंदात होते, ते ओरडून म्हणाले, “शमशोनाला आमची करमणूक करण्यास बाहेर आणा.” म्हणून त्यांनी शमशोनाला तुरुंगातून बाहेर आणले आणि त्याने त्यांची करमणूक केली. जेव्हा त्यांनी त्याला दोन खांबाच्या मध्ये उभे केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते जेव्हा आनंद साजरा करत होते तेव्हा ते म्हणाले, “तुम्ही शमशोनाला बोलवा, म्हणजे तो आमची करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला बंदिवानांच्या घरातून बोलावले, आणि तो त्यांच्यापुढे थट्टेचे पात्र झाला, आणि त्यांनी त्यास खांबांच्या मध्ये उभे केले होते.