Judges 16:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवळात बायका-पुरुष सगव्व्यांची एतच गर्दी उसळली होती. पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्वजण शमशोनची गंमत पाहण्यात दंग होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या इमारतीत स्त्रीपुरुषांची खूप गर्दी झाली होती. पलिष्ट्यांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे तीन हजार स्त्रीपुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता ते मंदिर पूर्णपणे पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते; पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तिथे होते आणि गच्चीवर सुमारे तीन हजार पुरुष आणि स्त्रिया शमशोन करीत असलेली करमणूक पाहत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते सभागृह तर पुरुषांनी व स्त्रियांनी भरलेले होते, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे होते; सुमारे तीन हजार स्त्री-पुरूष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते.